मराठवाडा

परभणी: मनपा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळण्याचे परभणी पालकमंत्री चे आश्वासन

 

परभणी महानगरपालिकेच्या बाहेर सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकी आंदोलनावर पालकमंत्री मा. मेघनादीदी बोर्डीकर आणि मा. नगरसेवक व भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी हस्तक्षेप करून समाधानकारक उत्तर दिले आहे.

कर्मचाऱ्यांनी मागील चार महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे १६ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळवण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. पालकमंत्री व नगरसेवक यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांचे बैठक सुरू असून काय करतील याकडे परभणीचे लक्ष लागले आहे

सरकारकडून लवकरच थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *