मराठवाडा

ट्रेन मध्ये एकाच दिवशी 1202 विनातिकीट प्रवासी पकडले – 4.9 लाख दंड वसूल

 

नांदेड विभागात ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०५.३० ते रात्री २०.०० वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकाच दिवशी १२०२ विनातिकीट / अनियमित प्रवासी तसेच अनबुक्ड सामानासह प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही १ मे २०२५ नंतरची सर्वाधिक एकदिवसीय कारवाई ठरली असून, एकूण ४.९ लाख दंड व तिकीट रक्कम वसूल करण्यात आली.

या मोहिमेत मनमाड–औरंगाबाद, परभणी–परळी, परभणी-नांदेड, आदिलाबाद–मुदखेड आणि पूर्णा–अकोला या मार्गांवरील अनेक एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली.

एकूण २१ गाड्यांची तपासणी करण्यात आली. प्रमुख गाड्यांमध्ये सचखंड एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, बेंगळुरू एक्सप्रेस, नांदिग्राम एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस, यशवंतपूर एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, नर–काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, संबलपूर एक्सप्रेस तसेच पूर्णा–आदिलाबाद, पूर्णा–अकोला आणि नरसापूर–नगरसोल–चेन्नई एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांचा समावेश आहे.

ही मोहीम श्री एन. सुब्बाराव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. जे. विजय कृष्ण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्री रितेश कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीमती इती पांडे, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे आणि श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली.

या मोहिमेत 32 तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या तपासणी मोहिमेचा उद्देश विनातिकीट प्रवासावर अंकुश ठेवणे, प्रवाशांमध्ये नैतिक भीती निर्माण करणे आणि प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *