शहर

शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई – अवैध प्रवासी वाहतूक, फटाका बुलेट व विना परवाना वाहनांवर एकूण 2,91,600 दंड आकारला

 

नांदेड (प्रतिनिधी): शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अवैध प्रवाशी वाहतूक, फटाका बुलेट, विना परवाना व परमिट वाहनांवर तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फळांच्या गाड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 2,91,600 इतका दंड वसूल करण्यात आला.

दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी शहर वाहतूक शाखा, वजिराबादचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे यांनी सिटी बी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकासह वजिराबाद चौक, महावीर चौक, रेल्वे स्टेशन, कलामंदिर आदी परिसरात वाहन तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत फटाका बुलेट, अवैध प्रवाशी वाहतूक, युनिफॉर्म न घालणारे ऑटोचालक, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एकूण 130 प्रकरणांत 1,59,550 इतका दंड आकारण्यात आला.

तसेच त्याच दिवशी शहर वाहतूक शाखा, इतवारा चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ पवार यांनी आपल्या पथकासह देगलूर नाका, जुना मोंढा व ढवळे कॉर्नर भागात वाहन तपासणी केली. ऑटोचालकांना गणवेश परिधान करण्याबाबत सुचना देण्यात आल्या, तर जुना मोंढा परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फळांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 126 प्रकरणांत 1,32,050 इतका दंड आकारण्यात आला.

दोन्ही शाखांच्या संयुक्त कारवाईतून फटाका बुलेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना परवाना/परमिट वाहनं, वाहतुकीस अडथळा करणारी गाड्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹2,91,600 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

ही मोहीम पोलिस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा तसेच दंगल नियंत्रण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राबवली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *