राजकोट – महबूबनगर – राजकोट दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी

प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे तर्फे राजकोट – महबूबनगर – राजकोट दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्र. 09575 राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष
ही गाडी 03 नोव्हेंबर 2025 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान चालविण्यात येईल. ती दर सोमवार रोजी राजकोट येथून दुपारी 13.45 वाजता सुटेल व मंगळवार रोजी सायंकाळी 20.00 वाजता महबूबनगर येथे पोहोचेल.
गाडी क्र. 09576 महबूबनगर – राजकोट साप्ताहिक विशेष
ही गाडी 04 नोव्हेंबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान चालविण्यात येईल. ती दर मंगळवार रोजी रात्री 23.00 वाजता महबूबनगर येथून सुटेल व गुरुवार रोजी सकाळी 05.00 वाजता राजकोट येथे पोहोचेल.
ही विशेष गाडी 20 डब्यांच्या ICF रचनेची असून त्यात वातानुकूलित कोच, स्लीपर आणि जनरल डबे समाविष्ट आहेत.
गाडी मार्गात अहमदाबाद, वडोदरा, सूरत, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, निजामाबाद, काचिगुडा आणि जदचेरला यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे घेईल.
ही सेवा पश्चिम रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वे दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरेल. प्रवाशांनी या साप्ताहिक विशेष गाडीचा लाभ घ्यावा व सुखद प्रवासाचा आनंद घ्यावा, अशी विनंती करण्यात येते.
सोबत गाडीचे वेळापत्रक जोडले आहे,
जनसंपर्क कार्यालय, नांदेड



