महाराष्ट्रा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर – 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी

 

मुंबई | महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठीची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.

राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीं साठी मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम
* नामनिर्देशन अर्ज सादर करण्यास प्रारंभ : 10 नोव्हेंबर 2025
* अंतिम मुदत : 17 नोव्हेंबर 2025
* छाननी : 18 नोव्हेंबर 2025
* अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख (अपील नसल्यास) : 21 नोव्हेंबर 2025
* अपील असलेल्या ठिकाणी माघारीची अंतिम तारीख : 25 नोव्हेंबर 2025
* उमेदवारांची अंतिम यादी : 26 नोव्हेंबर 2025
* निकाल राजपत्रात प्रसिद्ध : 10 डिसेंबर 2025

महत्त्वाचे तपशील
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

या निवडणुकीत एकूण 86859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.

* 246 नगर परिषदांपैकी 10 या नव्याने स्थापन झालेल्या आहेत.
* 42 नगर पंचायतींपैकी 15 नव्या आहेत.

उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा
अ वर्ग नगर परिषद: अध्यक्ष – ₹15 लाख, सदस्य – ₹5 लाख
ब वर्ग नगर परिषद: अध्यक्ष – ₹11.25 लाख, सदस्य – ₹3.5 लाख
क वर्ग नगर परिषद: अध्यक्ष – ₹7.5 लाख, सदस्य – ₹2.5 लाख
नगर पंचायत: अध्यक्ष – ₹6 लाख, सदस्य – ₹2.25 लाख

डिजिटल सुविधा
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपवरून मतदारांना त्यांचे नाव, मतदान केंद्र तसेच उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळू शकते. नामनिर्देशनही ऑनलाईन दाखल करता येणार आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *