मराठवाडा

परळी–आदिलाबाद डेमू मधील तांत्रिक बिघाडानंतर नांदेड विभागाची तात्काळ व प्रवासीहितदर्शी उपाययोजना

 

दिनांक 26.11.2025 रोजी परळी–आदिलाबाद डेमू क्र. 77615 ला देवठाणा हॉल्ट (थेरबन–हदगाव रोड स्टेशनांदरम्यान) मुदखेड-आदिलाबाद सेक्शनमध्ये तांत्रिक बिघाड (अ‍ॅक्सल लॉक)झाला. या कारणामुळे हिमायतनगर–आदिलाबाद दरम्यान गाडी अंशतः रद्द करण्यात आली. घटनेनंतर नांदेड विभागाने तात्काळ हालचाल करून प्रवाशांच्या सुरक्षित, सुलभ व वेळेवर पुढील प्रवासासाठी अनेक प्रवासी-केंद्रित उपाययोजना राबवल्या.

नांदेड विभागाकडून घेण्यात आलेली प्रमुख पावले :

1. तात्काळ मदत, पर्यायी वाहतुकीची उत्कृष्ट समन्वययोजना, अतिरिक्त खासगी वाहनांची उपलब्धता:
* गाडीत तात्काळत असलेल्या प्रवाशांना ताबडतोब समोसा, बिस्कीट, केळी, चहा व पिण्याचे पाणी इत्यादी अल्पोपहार पुरविण्यात आले.
* प्रवाशांना हिम्मायतनगर, किनवट, आदिलाबाद व इतर मार्गावरील स्टेशनांकडे पुढे जाण्यासाठी नांदेड व भोकर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बसेस ची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली.
* तातडीची गरज ओळखून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांचीही मदत घेऊन काही खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.

2. विशेष गाडीची व्यवस्था : हिम्मायतनगर–आदिलाबाद दरम्यान विशेष गाडी क्र. 77615 चालवण्यात आली. या विशेष गाडीला मार्गातील सर्व स्टेशनांवर थांबे देण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास विलंब न होता पुढे सुरू राहिला.

3. प्रवाशांना संपूर्ण भाडे परतावा : रेल्वेने केलेल्या पर्यायी व्यवस्थेचा लाभ न घेण्याचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकीटभाडे पूर्णपणे परत करण्यात आले.

डीआरएम नांदेड यांचे सक्रिय मार्गदर्शन : विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी विभागीय नियंत्रण कक्षातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘वार रूम’ मधून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले व सर्व संबंधित कार्यांचे सुयोग्य समन्वय साधत प्रवाशांना वेळोवेळी आवश्यक मदत मिळेल याची खात्री केली.

नांदेड विभागाने अवेळी उद्भवलेल्या परिस्थितीत त्वरित, कार्यक्षम व मानवतावादी प्रतिसाद देत आपल्या प्रवासीहितदर्शी सेवांचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *