शहर

नांदेड ग्रामीण पोलीस, RTO विभाग आणि इतवारा ट्रॅफिक पोलीसांची संयुक्त कारवाई

47 वाहनांची तपासणी; 12 वाहनांवर 45,000 दंड, तीन वाहनं जप्त

 

नांदेड: ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सर्व पोलीस स्टेशनना दिले आहेत. त्यानुसार नांदेड ग्रामीण हद्दीत आज संयुक्त कारवाई राबविण्यात आली.

पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, RTO विभाग नांदेड, तसेच इतवारा ट्रॅफिक पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 ते 2.00 या वेळेत PVR समोर रोडवर ही कारवाई करण्यात आली.

एकूण 47 वाहनांची तपासणी, नियमांचे उल्लंघन केलेल्या 12 वाहनांवर दंड, आकारलेला एकूण दंड : 45,000, 3 वाहन जप्तविविध नियमभंग करणारी 3 वाहने जप्त

नांदेड ग्रामीण परिसरात अनेक वाहनचालक कागदपत्रांशिवाय, क्षमतेपेक्षा जादा माल भरून, फलकापेक्षा वर माल घेऊन, तसेच रॉंग साइड व रॅश ड्रायव्हिंग करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वाहनचालकांना आवाहन केले की—
* कोणीही क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करू नये
* फलकापेक्षा वर माल भरू नये
* विना नंबर व विना रिफ्लेक्टर वाहन चालवू नये
* सर्व वाहनचालकांनी वाहनाची कागदपत्रे आणि परवाना सोबत बाळगावा

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *