स्पोर्ट्स

“हिंद- दी चादर “श्री गुरु तेगबहादुर सिंघ साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमला समर्पित मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिर

नांदेड प्रति. हरजिंदर सिंघ संधू / नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन व गुरुद्वारा बोर्ड संचलित सचखंड पब्लिक स्कूल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “हिंद -दी चादर” श्री गुरु तेगबहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमला समर्पित शिबिराचे मुख्य आयोजक, आर्चरी जिल्हा संघटना उपाध्यक्ष हरजिंदर सिंघ संधू व सचिव तथा मुख्य प्रशिक्षिका वृषालीतई पाटील जोगदंड यांच्या संकल्पनेतून सचखंड पब्लिक स्कूल नांदेड येथे पंधरा दिवसाचे मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

5 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2025 दरम्यान गुरुद्वारा बोर्ड संचलीत सचखंड पब्लिक स्कूल नांदेड येथे गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ . विजय सतवीरसिंग ( रिटा. आयएएस) गुरुद्वारा बोर्डाचे सुप्रीडेंड हरजित सिघ कडेवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन सचखंड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अनिल कौर खालसा , नांदेड जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंजी. हरजींदर सिंघ संधू संघटना ,सचिव तथा जिल्हा मुख्य प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड ,अँड विजयेंद्र सिंघ रागी, शिवकुमार काळे पाटील, यांनी केले.

प्रसंगी रणदीप कौर बैस,सरदार रणदीपसिंग पिरांगे ,सरदार प्रेमजीत सिंघ गाडीवाले , सरदार छत्तर सिंघ टंक , सरदार करणपाल सिंघ लोणीवाले सरदार भागींदर सिंघ फौजी, गुरुजीत कौर पट्टा , अमृतकौर कोटीतीर्थवाले , हरप्रीतकौर छत्ता , हरजिंदरकौर शाहू , जसप्रीतकौर बेदी , गुरप्रीत कौर संधू , जगतारकौर कोल्हापुरे यांची उपस्थिती होती .

सदरील प्रशिक्षण शिबिरात शाळेतील मुले व मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला शाळेतील विद्यार्थ्यांसमोर राज्य राष्ट्रीय पदक विजेत्या धनुर्धधारांनी प्रात्यक्षिक सादर करून खेळाडूंसह प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली . यावेळी बोलताना प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी खेळाचे महत्व पटवून देत धनुर्विद्या प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले.

तसेच प्रशिक्षण समारोप प्रसंगी जिल्हास्तर स्पर्धा आयोजित करून विजेत्या खेळाडूंना बक्षीस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडा शिक्षक , शिक्षिका राष्ट्रीय खेळाडू अथर्व जोंधळे , स्वयं कांबळे , सानवी दुर्गे ,श्रेया कांचनगिरे, प्रतीक फाजगे , अजिंक्य फाजगे , सिद्धांत सावंत , कृष्णा यादव , संस्कृती आरसुळे , आर्वी सावंत , वीरेंद्र रॉय , यांनी मेहनत घेतली . सदरील प्रशिक्षण शिबिर पुढील पंधरा दिवस चालणार असून भविष्यात जिल्ह्यासह राज्याला उत्कृष्ट खेळाडू मिळावेत म्हणून हा संकल्प राबविला असल्याचे मुख्य आयोजक व जिल्हा उपाध्यक्ष हरजिंदर सिंघ संधू यावेळी म्हणाले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *