स्पोर्ट्स

विनोद गोस्वामी यांची महाराष्ट्र पुरुष बास्केटबॉल संघाच्या व्यवस्थापक पदावर नियुक्ती

 

नांदेड येथील सेवानिवृत्त वरिष्ठ क्रीडा शिक्षक व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव श्री विनोद गोस्वामी यांची चेन्नई येथे होणाऱ्या दिनांक ४ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ७५ व्या राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष संघाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सरचिटणीस श्री गोविंद कृष्णन मुत्थुकुमार यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. यापूर्वी श्री विनोद गोस्वामी यांनी अनेक वेळा विविध राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल

स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून यशस्वी कार्य केले आहे व महाराष्ट्र राज्यास पदक प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री निखिल लातूरकर , उपाध्यक्ष श्री हरबिंदरसिंह संधू , चंद्रशेखर गावंडे , श्री विष्णु शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जयकुमार टेंभरे व इतर मान्यवर यांनी अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्या दिल्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *