महाराष्ट्रा

UFBU कडून ३० डिसेंबर २०२५ रोजी देशव्यापी आंदोलन

सर्व केंद्रांवर एकाचवेळी जोरदार निदर्शने

 

नांदेड | ३० डिसेंबर २०२५ रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या वतीने ३० डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभरात सर्व बँक केंद्रांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आठवड्याला ५ दिवस बँकिंग प्रणाली लागू करावी या प्रमुख आणि प्रलंबित मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनात AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF, INBOC, NOBW आणि NOBO या सर्व प्रमुख बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेला कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास, सतत बदलणारी धोरणे आणि काम–जीवन समतोल बिघडत असल्यामुळे ५ दिवसांचा आठवडा लागू करणे अत्यावश्यक असल्याचे UFBU ने स्पष्ट केले आहे.

UFBU च्या नेत्यांनी सांगितले की, इतर शासकीय विभागांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांनाही ५ दिवसांचा आठवडा देण्यात यावा. अनेक देशांमध्ये ही प्रणाली यशस्वीपणे राबवली जात असून भारतातही ती तातडीने लागू करणे गरजेचे आहे.

दरम्यान, सरकार व बँक व्यवस्थापनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा UFBU कडून देण्यात आला आहे. या आंदोलनाचा परिणाम देशभरातील बँकिंग व्यवहार, चेक क्लिअरन्स, कर्ज प्रक्रिया आणि ग्राहक सेवांवर होण्याची शक्यता आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *