नांदेडमध्ये VVIP दौऱ्यामुळे 24 व 25 जानेवारी रोजी वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी

नांदेड | प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये नांदेड शहरात वाहतूक नियमनासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दिनांक 24 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (VVIP) दौरा होत असून, मोदी ग्राऊंड येथे होणाऱ्या “हिंद की चार” कार्यक्रमास केंद्रीय व राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यात केंद्रीय मंत्री मा. ना. श्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. ना. श्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री मा. ना. श्रीमती रेखा गुप्ता, हरियाणाचे मुख्यमंत्री मा. ना. श्री नायबसिंघ सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री मा. ना. श्री भगवंत मान यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून, शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी मिळालेल्या अधिकारान्वये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक नियमनाची अधिसूचना जारी केली आहे.
वाहतुकीस तात्पुरते बंद असलेले मार्ग (VVIP दौऱ्यादरम्यान):
आसना ब्रिज – शंकरराव चव्हाण चौक – गुरुद्वारा – मालटेकडी रोड – मालटेकडी ओव्हरब्रिज,
नमस्कार चौक ते नाईक चौक – अण्णाभाऊ साठे पुतळा – हिंगोली गेट ओव्हरब्रिज – चिखलवाडी चौक,
आय.टी.आय ते अण्णाभाऊ साठे पुतळा,
अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक (आनंदनगरकडे),
हिंगोली गेट अंडरब्रिज ते अण्णाभाऊ साठे पुतळा,
चिखलवाडी ते हिंगोली गेट ओव्हरब्रिज व अंडरब्रिज,
चिखलवाडी ते गुरुद्वारा – हनुमान मंदिर – भगतसिंग चौक,
बर्की चौक ते जुना मोंढा मार्गे वजिराबाद,
कविता हॉटेल ते जुना मोंढा कौठा,
एम.जी. हेक्टर शोरूम ते साई कमान कौठा,
भगतसिंग चौक ते श्रीराम चौक (पूर्वेकडील बाजू),
अहिल्यादेवी होळकर चौक (मामा चौक),
बीडीडीएस ऑफिस ते मामा चौक – श्रीराम चौक,
लींबगाव ते वाघी रोड – हसापुर (कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांखेरीज),
रविनगर ते नागार्जुन शाळा व कौठा चौकी ते रविनगर,
बसवेश्वर पुतळा – अहिल्याबाई होळकर चौक – पदमजा सिटी – भगतसिंग चौक.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
चिखलवाडी ते नाईक चौक जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – कोर्टामागील रस्ता – हिंगोली गेट अंडरब्रिज – गोकुळनगर,
वजिराबाद चौक – आय.टी.आय – नवीन मोंढा – महादेव दाल मिल मार्ग,
अण्णाभाऊ साठे पुतळा ते नाईक चौक महादेव दाल मिल रोड,
चिखलवाडी ते हिंगोली गेट अंडरब्रिजसाठी शिवाजी महाराज पुतळा – रेल्वे स्टेशन मार्ग,
बसवेश्वर चौक ते लातूर फाटा मार्ग सुरू राहील,
लींबगावहून हसापुरकडे भवानी चौक – छत्रपती चौक मार्ग वापरावा.
दरम्यान, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पोलिसांकडून करण्यात आले आहे.



