नांदेड शहरात बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई; 95 केसेस नोंद

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड शहरात दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सण-उत्सव शांततेत पार पडावेत या उद्देशाने विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांकडून प्राप्त तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सदर मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहनचालक, कर्कश/मॉडिफाइड सायलेंसर (फटाका बुलेट), विनानंबर वाहने तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे — पोस्टे शिवाजीनगर – 18 वाहने, पोस्टे वजिराबाद – 04 वाहने, पोस्टे भाग्यनगर – 25 वाहने, पोस्टे विमानतळ – 18 वाहने, पोस्टे नांदेड ग्रामीण – 12 वाहने, पोस्टे वजिराबाद सिटीबी – 17 वाहने, पोस्टे इतवारा सिटीबी – 01 वाहन
एकूण 95 केसेस नोंदवून संबंधित बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच पोस्टे भाग्यनगर हद्दीत 2 डीजे संचालकांवर गुन्हे दाखल करून जप्तीची कार्यवाही करण्यात आली. पोस्टे विमानतळ हद्दीत 2 प्रकरणांमध्ये आर्म ॲक्ट अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



