शहर
सांगवी (बु) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नांदेड दि. २१ सांगवी (बु) येथील डॉ. प्रवीण खिल्लारे यांच्या मातोश्री केअर क्लिनिक येथे रविवार दि. २२फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेविका मा.सौ. मीनलताई गजानन पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिकेत (पिल्लू
भाऊ) ढगे हे उपस्थित राहणार आहेत या शिबिरामध्ये सर्व आजाराची तपासणी मोफत केली जाणार आहे तरी सांगवी परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहान मातोश्री केअर क्लिनिकचे संचालक डॉ. प्रवीण खिल्लारे यांनी केले आहे.



