महाराष्ट्रा

स्वयंचलित ब्लॉक प्रणालीच्या कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते नियमन

 

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत पारस – गैगाव – अकोला विभागात अप व डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक प्रणाली (Automatic Block System) बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ – बडनेरा विभागात काही गाड्यांचे तात्पुरते नियमन करण्यात येणार आहे.

सदर कामादरम्यान खालील गाड्यांचे नियमन करण्यात येईल :
*दिनांक 23.04.2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 12485 नांदेड – श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी काटेपुर्णा – शेगाव विभागात सुमारे 2 तास नियमन करण्यात येईल.

* दिनांक 23.04.2026 रोजी सुटणारीगाडी क्र. 22723 नांदेड – श्रीगंगानगर एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे 30 मिनिटे नियमन करण्यात येईल.

* दिनांक 22.04.2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 17605 काचीगुडा – भगत की कोठी एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे 30 मिनिटे नियमन करण्यात येईल.

* दिनांक 22.04.2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 12719 जयपूर – हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी अकोला येथे क्रॉसिंगमुळे सुमारे 30 मिनिटे नियमन करण्यात येईल.

प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी व त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कामांदरम्यान होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *