खरडी यार्ड रिमॉडेलिंग कामांमुळे काही रेल्वे गाड्यांच्या धावण्यात तात्पुरते बदल

मध्य रेल्वे कडून कल्याण-कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामाशी संबंधित खरडी यार्ड रिमॉडेलिंग कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी २५/२६ एप्रिल २०२६ (शनिवार/रविवार) रोजी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या धावण्यात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
राज्य राणी एक्स्प्रेस आंशिक रद्द / आंशिक प्रारंभ:
दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी गाडी क्र. १७६११ हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्स्प्रेस मनमाड पर्यंतच धावेल. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान आंशिकतः रद्द करण्यात येईल.
दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी गाडी क्र. १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– हजूर साहिब नांदेड राज्य राणी एक्सप्रेस ही गाडी मनमाड येथून प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेट) होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात येईल.
मार्ग बदल (डायव्हर्जन):
दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी गाडी क्र. ११००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– बल्लारशा नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.
दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी गाडी क्र. १७०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लीन्गम्पल्ली देवगिरी एक्सप्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा – पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.
रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी ही कामे करण्यात येत आहेत. प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



