प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने पुढील ट्रेन ऑन डिमांड (TOD) विशेष गाड्यांची एक फेरी वाढविण्याच्या निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या विद्यमान थांबे, वेळापत्रक सह चालवल्या जाणार आहेत.
मुदतवाढ देण्यात आलेल्या विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
• गाडी क्रमांक 07605 तिरुपती – अकोला विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा 24 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
• गाडी क्रमांक 07606 अकोला – तिरुपती विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 26 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07015 नांदेड – तिरुचेंनुर विशेष गाडी शनिवारी धावणार असून तिची सेवा 25 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07016 तिरुचेंनुर – नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 26 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07189 नांदेड – धर्मावरम विशेष गाडी शुक्रवारी धावणार असून तिची सेवा 01 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07190 धर्मावरम – नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा 03 मे एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07609 जालना – तिरुचेंनुर विशेष गाडी सोमवारी धावणार असून तिची सेवा 27 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
•
• गाडी क्रमांक 07610 तिरुचेंनुर – जालना विशेष गाडी मंगळवारी धावणार असून तिची सेवा 28 एप्रिल 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सोयीस्करपणे नियोजित करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.



