महाराष्ट्रा

रेल्वे पूल कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक – काही गाड्या अंशतः रद्द व उशिरा धावणार

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी-मनमाड विभागातील पोटुल-दौलताबाद दरम्यान असलेल्या लेव्हल क्रॉसिंग क्र. 41 येथे आरएच गर्डर बसविणे/काढणे या अभियांत्रिकी कामासाठी ओएचई पॉवर ब्लॉकसह ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

25 एप्रिल व 02 मे 2026 रोजी प्रत्येकी 03 तासांचे दोन ब्लॉक घेण्यात येणार असून त्याचा खालील गाड्यांवर परिणाम होईल.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

गाडी क्र. 17688 धर्माबाद–मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ही छत्रपती संभाजीनगर – मनमाड दरम्यान 25 एप्रिल व 02 मे 2026 रोजी अंशतः रद्द राहील. धर्माबाद ते छत्रपती संभाजीनगर अशी धावेल.

गाडी क्र. 17687 मनमाड–धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस ही मनमाड – छत्रपती संभाजीनगर दरम्यान 25 एप्रिल व 02 मे 2026 रोजी अंशतः रद्द राहील. या दिवशी छत्रपती संभाजीनगर ते धर्माबाद अशी धावेल.

उशिरा धावणाऱ्या गाड्या:

गाडी क्र. 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस ही पोटुल स्थानकावर सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात येईल.

रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असून आवश्यक पायाभूत कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *