महाराष्ट्रा

काकीनाडा टाउन ते हिसार या विशेष गाडीला मुदत वाढ

(मार्गे नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला)

 

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन ते हिसार दरम्यान मुदखेड –नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे “Train on Demand (TOD)” विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
हि गाडी दिनांक 21 एप्रिल पासून सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेवून या गाडीला दिनांक 28 एप्रिल आणि 01 में रोजी मुदत वाढ देण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 28.04.2026 (मंगळवार) रोजी काकीनाडा टाउन स्थानकावरून सकाळी 05.40 वाजता सुटेल आणि नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशिम (03.55), अकोला (05.45), भुसावळ, वडोदरा, रतलाम आणि चित्तौडगड या प्रमुख स्थानकांमार्गे गुरुवारी 13.40 वाजता हिसार येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 01.05.2026 (शुक्रवार) रोजी हिसार येथून 14.10 वाजता सुटेल आणि रविवारी 12.35 वाजता काकीनाडा टाउन येथे पोहोचेल.

या गाडीमध्ये एकूण २४ डब्यांची रचना असणार असून त्यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास, जनरल सेकंड क्लास तसेच एसएलआर डबे समाविष्ट आहेत. दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी कटिबद्ध असून अशा विशेष गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *