देश विदेश

उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन तिरुपती – छपरा दरम्यान नांदेड-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे विशेष रेल्वे गाडीची एक फेरी

 

उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे तर्फे तिरुपती आणि छपरा जंक्शन दरम्यान विशेष रेल्वे ची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमुळे दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष गाड्यांचा तपशील
गाडी क्र. ०७४४३ तिरुपती – छपरा जं. विशेष गाडी:

ही गाडी ०७ मे २०२६ (गुरुवार) रोजी रात्री २३:५५ वाजता तिरुपती येथून सुटेल आणि रविवारी सकाळी ०७:४५ वाजता छपरा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०७४४४ छपरा जं. – तिरुपती विशेष गाडी:

ही गाडी १२ मे २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ०५:०० वाजता छपरा जंक्शन येथून सुटेल आणि गुरुवारी दुपारी १२:३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.

या विशेष गाड्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी एक फेरी चालविण्यात येणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

महत्त्वाचे थांबे या गाड्यांना रेणीगुंटा, कडप्पा, तडीपत्री, द्रोण, कुरनूल सिटी, गडवाल, महबूबनगर, काचीगुडा, मलकाजगिरी, कामारेड्डी, हुजूर साहिब नांदेड , पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, लखनौ, अयोध्या, गोरखपूर, सिवान आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *