NEET पेपरफुटी प्रकरण : RCC कोचिंग क्लासचे शिवराज मोटेगावकर अखेर CBI कडून अटकेत; नांदेडमधील क्लासेस सील

नांदेड | प्रतिनिधी – देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात नांदेडमधील RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर नांदेडमधील संबंधित कोचिंग क्लासेसवरही तपास यंत्रणेकडून सील करण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात विविध राज्यांमध्ये तपास सुरू असून, अनेक संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर RCC कोचिंग क्लासचे नाव समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी पुरावे गोळा करत कारवाई तीव्र केली होती. अखेर शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडमधील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. तपास यंत्रणेकडून पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



