श्री पंढरी जेष्ठ नागरिक संघातर्फे जेष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वाटप

ब्रम्हपुरी : श्री पंढरी जेष्ठ नागरिक संघ, चौफाळा ब्रम्हपुरी यांच्या वतीने महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधील सवलती जेष्ठ नागरिकांना सहज मिळाव्यात या उद्देशाने चौफाळा, ब्रम्हपुरी व विणकर कॉलनी परिसरातील सुमारे १०० ते १५० जेष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन परिसरातील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक प्रहादरावजी सुरकुटवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी संघाच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी श्री पंढरी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदासरावजी वल्लाकट्टी, उपाध्यक्ष श्रीराम सुकेवार, सचिव सदाशिवरावजी चलिन्द्रवार तसेच गाविंदराव गरुडकर, भागाराम मच्छेवार, मनोहरराव चलिन्द्रवार, चंद्रकांतराव अंकगवार, भागवल सावकार, धनपालवार, सुरजितसिंहजी पुजारी, गंगाधरराव दासरखार, अभय हसनपल्ली, मनीष झगडे, लोकडोजी माडेवार यांच्यासह संघाचे सर्व सदस्य व परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



