डॉ.श्रद्धा जाधव यांच्या स्ट्रेस रिलीफ डिव्हाइस’पेटंट ला केंद्र सरकारकडून मान्यता

नांदेड/प्रतिनिधी.. नांदेडच्या कन्या तथा संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या कन्या डॉ. श्रद्धा जाधव-वकिल यांनी मानसोपचार आणि
न्यूरोमॉड्युलेशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान मिळवला आहे.
डॉ. श्रद्धा जाधव-वकील यांनी स्ट्रेस रिलीफ डिव्हाइस या अभिनव संकल्पनेसाठी भारत सरकारकडे पेटंट प्रदान करून मान्यताप्राप्त केल्याने डॉ.श्रध्दा जाधव -वकिल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मराठवाड्यातील महिला मानसोपचार तज्ज्ञामध्ये आशा प्रकारचे पेटंट सादर करून मान्यता मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने २९ जानेवारी २०२६ रोजी पेटंट च्या डिझाईनची अधिकृत नोंदणी केली होती.
या संशोधनात डॉ. श्रद्धा जाधव यांच्यासोबत मोहम्मद अझर बरगौर ,पंकज ढोबळे, यांचेही योगदान आहे. मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी न्यूरोमॉड्युलेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. डॉ.श्रध्दा जाधव-वकिल यांनी मानसोपचार आणि न्यूरोमॉड्युलेशन क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, माजी खा.विठ्ठलराव जाधव, धुळे ग्रामीणचे आ. राम पाटील भदाणे, एमजीएम चे उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग जाधव, अशोकराव जाधव, शिवाजीराव जाधव, अँड. सतीशराव पुंड,
अँड.मनवर मॅडम, अविनाश जाधव, व्यंकटराव भोसले उदगीरकर, संजय पवार, प्राचार्य रवी जाधव,बॅरिस्टर अँड. राजीव जाधव,सौ. ज्योतीताई पवार, सौ. क्रांती वडजे, व्यंकटराव करखेलीकर, सचिन पोवळे -पाटील, नेताजी भोसले, पंढरीनाथ बोकारे,प्रल्हाद आयनेले, विजयकुमार मंगरुळे, यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. श्रद्धा जाधव- वकील यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



