मराठवाडा

रेल्वे सुरक्षेला बळकटी : नांदेड विभागात हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) नेटवर्कचा विस्तार

 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मिरखेल आणि उमराम येथे दोन नवीन हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) कार्यान्वित केले आहेत. हे दोन्ही डिटेक्टर 27 मे 2026 पासून कार्यरत झाले आहेत.
या नव्या स्थापनेमुळे नांदेड विभागातील हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) केंद्रांची संख्या तीनवरून पाच झाली असून, यापुर्वी नांदेड विभागात मुगट, बसमत आणि दौलताबाद या तीन ठिकाणी हे होते.

हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) मुळे धावत्या गाड्यांमधील कार्ट्रिज टेपर रोलर बेअरिंग (CTRB) व अॅक्सल बॉक्सच्या स्थितीवर अधिक प्रभावीपणे आणि रिअल-टाइममध्ये नजर ठेवणे शक्य झाले आहे. हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) ही एक अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली असून, गाडी सामान्य वेगाने जात असताना तिच्या अॅक्सल बेअरिंगचे तापमान स्वयंचलितपणे मोजते. तापमानात असामान्य वाढ आढळल्यास संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे किरकोळ दोष मोठ्या बिघाडात रूपांतरित होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात.

या तंत्रज्ञानामुळे रोलिंग स्टॉक आणि रेल्वे पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यास मदत होते, रेल्वे वाहतुकीतील अडथळे कमी होतात तसेच प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची सुरक्षितता व विश्वासार्हता वाढते. दोषांचे लवकर निदान झाल्याने देखभाल नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते आणि सेवा खंडित होण्याचे प्रमाणही कमी होते. हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) नेटवर्कचा हा विस्तार भारतीय रेल्वेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि कार्यक्षम रेल्वे संचालनाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. नांदेड विभाग प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार रेल्वे सेवा देण्यासाठी अशा आधुनिक सुरक्षा उपाययोजना सातत्याने राबवत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *