महाराष्ट्रा

दक्षिण रेल्वेतील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे चेन्नई एक्स्प्रेस च्या मार्गात बदल

प्रवाशांना कळविण्यात येते की, दक्षिण रेल्वेच्या अरक्कोनम (AJJ) परिसरातील तिसरी व चौथी मार्गिका जोडणी प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येत आहे. या कामामुळे 13 जून 2026 ते 28 जून 2026 या कालावधीत काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून काही स्थानकांवरील थांबे रद्द करण्यात आले आहेत.

यानुसार खालील गाड्या परिवर्तित मार्गाने धावणार आहेत :
1. गाडी क्रमांक 16003 चेन्नई सेंट्रल– नगरसूल एक्सप्रेस दिनांक 21 जून 2026 रोजी जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम–गुंतकल मार्गे वळविण्यात येईल. या मार्ग परिवर्तनामुळे तिरुत्तणी, पुत्तूर, रेणीगुंटा, राजमपेट, कडप्पा, येर्रगुंटला, ताडीपत्री व गुटी या स्थानकांवरील थांबे रद्द राहतील.

2. गाडी क्रमांक 16003 चेन्नई सेंट्रल– नगरसूल एक्सप्रेस दिनांक 28 जून 2026 रोजी अरक्कोनम–काटपडी–जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम मार्गे वळविण्यात येईल. या दिवशीही तिरुत्तणी, पुत्तूर, रेणीगुंटा, राजमपेट, कडप्पा, येर्रगुंटला, ताडीपत्री व गुटी या स्थानकांवरील थांबे रद्द राहतील.

गाडीचे नियमन:
1. गाडी क्रमांक 16004 नगरसूल –चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दिनांक 22 जून 2026 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल.
रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, प्रवासापूर्वी गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल व अद्ययावत माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा चौकशी सेवेचा उपयोग करावा.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *