मराठवाडा

शाडू मातीच्या ‘बीजगणेशा’तून पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

 

प्रतिनिधी : शेख इमरान

बहिरगाव, ता. कन्नड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हा परिषद प्रशाला, बहिरगाव येथे राष्ट्रीय हरित सेना व इको क्लबच्या वतीने शाडू मातीपासून ‘बीजगणेशा’ निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण करणाऱ्या या उपक्रमाला सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

कलाशिक्षक सलीम आत्तार व स्थानिक कलाकार राजू शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. मूर्तीमध्ये विविध पर्यावरणपूरक बियांचा वापर करून गणेशोत्सवानंतर विसर्जन केल्यानंतर त्यातून रोपे तयार होऊ शकतात, ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.

 

‘कलेतून पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बीजगणेश तयार केले. मातीला आकार देताना विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेशही या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आला.

 

कार्यशाळेस प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घोलप, वनरक्षक संध्या खाडे तसेच शिक्षक दिलीप महाजन, कुलभूषण व्यवहारे, राजेंद्र शिंपी, श्रीमती नूतन पवार, शाम खोसरे, सलीम आत्तार, राधेश्याम शर्मा, श्रीमती किरण पाटील, स्वप्नील गांगुर्डे, गणेश बल्हाळ, रवींद्र ठाकरे, किसनाबाई गोरे व सविता कुंटे यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या कला

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *