मराठवाडा

शेख अहमद (बाबा) यांना राज्यस्तरीय ‘चालक रत्न’ पुरस्काराने सन्मानित

 

नांदेड : कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील समाजसेवक तथा रिक्षाचालक शेख अहमद (बाबा) बागवाले यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याची दखल घेत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘चालक रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेख अहमद (बाबा) हे टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह राज्याबाहेरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्तव्यदक्ष चालक म्हणून कार्य करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत.

कोरोना काळात गरजू व गोरगरीब नागरिकांना मदत करणे, रिक्षाचालकांचा सत्कार, पाणपोई सुरू करणे, खिचडी वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन आदी सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘चालक रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सोलापूर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील होते. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी, झगडे साहेब, गिरी साहेब, वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद रियाज, महासचिव प्रदीप (आबा) शिंगे, ऑटो रिक्षा कृती समितीचे महिपती पवार व प्रल्हाद सोनवणे, आझाद संघटनेचे संस्थापक शफिक भाई पटेल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

तसेच टायगर संघटनेचे उपाध्यक्ष शेख तयब, जिल्हाध्यक्ष शेख अहमद (पत्रकार), शहराध्यक्ष मुखीद पठाण, लातूर जिल्हाध्यक्ष शेख नयमोदिन यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले रिक्षाचालक उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण २७ जिल्ह्यांतील चालकांचा ‘चालक रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

शेख अहमद (बाबा) यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध सामाजिक व वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *