मराठवाडा

वडिसारोळा येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा

 

मानवत : तालुक्यातील सावळी, ता. मानवत येथील शेतकरी श्री. रंग काळे यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची यावेळी माहिती घेण्यात आली.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांवर झालेला परिणाम, उत्पादनातील संभाव्य घट आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि झालेल्या नुकसानीची जाणीव असून, त्यांच्या हक्काची मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *