महाराष्ट्रा

‘मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कांसाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा’

नांदेड : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, राजकीय हक्कांचे संरक्षण, न्याय आणि आरक्षणाच्या प्रश्नांसाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने भूमिका घेतली असून, मुस्लिम समाजाने त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे सामाजिक क्षेत्रातील जाकेर चाऊस यांनी म्हटले आहे.

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या अनेक दशकांपासून मुस्लिम समाजाशी संबंधित विविध प्रश्नांवर आंदोलने व भूमिका घेतल्याचा दावा चाऊस यांनी केला. 1999 मध्ये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आंदोलन उभारण्यात आल्याचे तसेच 2002 मध्ये लागू करण्यात आलेल्या पोटा कायद्याविरोधात महाराष्ट्रासह देशभर आंदोलने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अभिनेते रजा मुराद यांनीही सहभाग घेतल्याचा दावा त्यांनी केला.

परभणी येथील खाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणातही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेत महाराष्ट्रभर आंदोलन करून न्यायासाठी प्रयत्न केल्याचे चाऊस यांनी नमूद केले. तसेच टिपू सुलतान आणि औरंगजेब यांच्या संदर्भातील घटनांमध्ये मुस्लिम युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.

दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे चाऊस यांनी सांगितले. इराणसोबत भारताचे दीर्घकाळापासून असलेले संबंध आणि विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील सहकार्याचा संदर्भ देत भारताने इराणबाबत स्वतंत्र भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानक परिसरात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे चाऊस यांनी सांगितले. या मोर्चात मुस्लिम समाजातील विद्वान, उलेमा, मौलवी, मुस्तीं, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मशीद, मदरसे आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये मोर्चाची माहिती पोहोचवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थितीत निष्पाप नागरिकांच्या होत असलेल्या मृत्यूला विरोध आणि इराणच्या समर्थनार्थ आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *