क्राईम

कोबींग ऑपरेशन राबवुन अग्निशस्त्र वापरून गुन्हे करणाऱ्या आरोपी वर कार्यवाही

 

त्याचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 14.07.2023 रोजी 23:00 ते दिनांक 15.07.2023 चे 04.00 वा. चे दरम्यान स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शहरातील पोलीस स्टेशन भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा आणि नांदेड ग्रामीण चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कॉबींग ऑपरेशन राबवुन अग्निशस्त्राचा वापर करून गुन्हे करणारे आरोपीतांना चेक करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर कार्यावाही मध्ये स्थागुशाचे दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस अंमलदार यांनी भाग घेवुन अकरा अग्निशस्त्र वापरणारे आरोपी चेक करून एक आर्मस अॅक्टची कार्यवाही करून खंजर जप्त करण्यात आला आहे. आणि पोस्टे मुदखेड गुरन 21 / 2023 कलम 395 मदवि व सह कलम 3 / 25 माहका 3(1)3( 2 ) 3 (4) मोक्का मधील फरार आरोपी नामे अजय शामराव राठोड, वय 27 वर्षे, रा. वरदडा तांडा ता. मुदखेड जि. नांदेड यास अटक केली आहे.
पोस्टे भाग्यनगरचे चार पोलीस अधिकारी व बारा अंमलदार यांनी भाग घेवुन अठरा अग्निशस्त्राचा वापरणारे आरोपी चेक केले. पोस्टे विमानतळचे चार पोलीस अधिकारी व वीस पोलीस अंमलदार यांनी भाग घेवुन एकोणवीस अग्निशस्त्र वापरणारे
आरोपी चेक करून दोन वॉरंट तामील केले.
पोस्टे वजिराबाद हध्दीत एक अर्मस अॅक्टची कार्यवाही करून खंजर जप्त करण्यात आला. एक पाहिजे आरोपी
अटक केला. जबरी चोरीतील दोन आरोपी अटक केले. पोस्टे इतवाराचे पाच पोलीस अधिकारी आणि तीस पोलीस अंमलदार
यांनी भाग घेऊन तेवीस अग्निशस्त्र वापरणारे आरोपी चेक केले. एक पाहिजे असलेला आरोपी अटक केला आहे.
पोस्टे शिवाजीनगरचे तीन पोलीस अधिकारी आणि अठरा पोलीस अंमलदार यांनी भाग घेवुन तेरा अग्निशस्त्र वापरणारे आरोपी चेक केले. 110/117 महराष्ट्र पोलीस कायद्याच्या चार कार्यावाहया केल्या. पोस्टे नांदेड ग्रामीणचे चार पोलीस अधिकारी आणि चोवीस पोलीस अंमलदार यांनी भाग घेवुन एकतीस अग्निशस्त्र वापरणारे आरोपी चेक केले आणि एक आर्मस अॅक्टची कार्यवाही करून एक खंजर जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री आबिनेश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्रीमती शाफकत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, मा. श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण मा. श्री सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर मा. श्री. चंद्रशेन देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, मा. श्री. प्रशांत संपते, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद, मा. श्री. मारोती थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार यांनी व वरील प्रमाणे पोलीस स्टेशन येथील मनुष्यबळासह त्यांच्याच हध्दीमध्ये कोंबींग ऑपरेशन राबवुन कार्यवाही करण्यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *