क्राईम
सिडको, नांदेड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी 24 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये अण्णा भाऊ साठे चौक सिडको नांदेड येथे खंडणीचे कारणावरुन चार इसमांनी अवधुत काळबा गिरडे वय 19 वर्ष रा. असदवन, नांदेड याचा खंजरने खुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 517/2023 कलम 302, 384, 385, 386,294, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.द.वि सहकलम 4/25, 4/27 शस्त्र अधिनियम अन्वये दिनांक 15/07/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 15/07/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी हे वसंतराव नाईक कॉलेज सिडको, नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) मनप्रीतसिंघ ऊर्फ तेजु पि. चरणसिंघ टाक वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा. एन डी 41 जयभवानीनगर, सिडको नांदेड 2) सुमित संतोष सरोदे वय 19 वर्ष व्यवसाय बेकार रा. एन डी 41 के.टू राहुलनगर, सिडको नांदेड यांना 24 तासाचे आत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हा केलेले दोन विधीसंघर्षीत बालकाचे पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मिळुन आलेल्या आरोपीतांना आज रोजी ताब्यात घेवुन त्यांना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / सचिन सोनवणे, सपोउपनि / माधव केंद्रे, संजय केंद्रे, पोहेकॉ / गुंडेराव करले, पोना / पद्मसिंह कांबळे, दिपक पवार, पोकॉ/ देवा चव्हाण, मोतीराम पवार, मारोती मोरे, बालाजी यादगीरवाड, धम्मा जाधव, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, चालक अर्जुन शिंदे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.



