महाराष्ट्रा

राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणुन देगलूर पोलीस स्टेशनची निवड

 

सन 2016 मध्ये झालेल्या DGSP / IGSP कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वात्कृष्ट पोलीस ठाण्यांची (Best Police Staion) निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रिय स्तरावर घेण्यात आला होता त्याप्रमाणे सवोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून करण्यात येते.

सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवीणे, गुणवत्ता वाढवीणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी दरवर्षी राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट 5 (पाच) पोलीस ठाण्यांची निवड करून सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.

भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांचे धर्तीवर सन 2022 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष द नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून परिक्षेत्र / आयुक्तालय स्तरावरील समितीने निवड केलेल्या प्रत्येकी उत्कृष्ट 02 (दोन) पोलीस ठाण्यांमधून 05 (पाच) सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती.

सन-2022 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून 05 (पाच) पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली असून सदर 05 (पाच) पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे 2022 म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हयातील देगलूर पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणुन घोषित करण्यात आले असुन त्यांना पन्नास हजार रूपयाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

सदरची कामगीरी तत्कालीन पोलीस अधिक्षक, मा. श्रीकृष्ण कोकाटे, व विद्यमान पोलीस अधिक्षक, मा. श्री अबिनाश कुमार, मा. श्री सचिन सांगळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर, यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोनि श्री सोहन माछरे, पोस्टे देगलूर व देगलूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *