हेल्थ

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश; थायमोमा आणि अमेलोब्लास्टोमा या दुर्मिळ कर्करोगावर उपचार

नांदेड – प्रतिनिधी/ थायमोमा आणि अमेलोब्लास्टोमा हे दुर्मिळ कर्करोग आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर अमेलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते. बहुतेकदा, दाढांच्या सभोवतालच्या जबड्यात गाठी आढळतात तसेच सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षणे देत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या ४० नंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर यशस्वीपणे मात करता येते असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी चंद्रलोक हॉटेल येथील पत्रकार परिषेदेत केले .

याविषयी पुढे माहीती देतांना त्यांनी सांगितले की, चाकूर जि.लातूर येथील रहीवाशी असलेल्या रुग्ण सौ.कामिनी तांडोरे या ५५ वर्षीय महीला रुग्ण ह्या मागील दोन-अडीच वर्षापासून सततच्या खोकल्याने त्रस्त होत्या यावर त्यांनी लातूर सह आजूबाजूच्या जिल्हयातील अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु गुण येत नव्हता त्यामुळे लातूर येथील डॉ. झंवर यांनी त्यांना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे एकवेळेस तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांच्या कुंटूबिंयानी आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर तपासणीअंती थायमोमास हा गंभीर कॅन्सर आढळला होता.

थायमोमा या कॅन्सर मध्ये बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. त्याऐवजी, जेव्हा ट्यूमर आपल्या छातीतील अवयवांवर परिणाम करतो तेव्हा लक्षणे उद्भवतात ज्यात वेदना आणि श्वासोच्छवासाच्या समस्या अशा प्रकारची लक्षणे समाविष्ट आहेत:

सौ.कालिंदा तोंडारे यांना ट्यूमर मुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मोठ्या नसांवर दाब निर्माण होऊन त्यांना सतत खोकला, धाप लागणे, थकवा , चक्कर येणे व जेवण करता न येणे अशा अनेक समस्या तयार झाल्या होत्या यावर कॅन्सर निदानानंतर डॉ.सचिन मर्दा व त्यांच्या टिमने सलग ७ तासाची शस्त्रक्रिया पार पाडत जवळपास दिड किलो वजनाचा टयुमर ऑपरेशनव्दारे बाहेर काढून रुग्णास जिवनदान दिले

अमेलोब्लास्टोमा – जबड्याचा एक दुर्मिळ विकार ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते

अमेलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते. बहुतेकदा, दाढांच्या सभोवतालच्या जबड्यात गाठी आढळतात सहसा, अमेलोब्लास्टोमा लक्षणे नसलेला असतो आणि सूज द्वारे लक्षात येण्याआधी हळूहळू विकसित होतो. दरम्यान रुग्णाला अनेक लक्षणांचा सामना करावा लागतो जसे की वेदना न करता सूज येणे,तोंडात अल्सर, चेहऱ्यावर विकृती, वेदना यासह गंभीर समस्या उद्भवू शकतात अशी माहीती देतांना सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी नमूद केले की, तरोडा बु. नांदेड येथील ३७ वर्षीय तरुण सदानंद कल्याणकर यांना दाढेच्या बाजूला गाठ झाल्याने त्यांनी डॉ.साहेबराव मोरे यांच्याशी संपर्क साधला त्यानुसार एंकदरील परिस्थिी लक्षात घेत डॉ.साहेबराव मोरे यांनी त्यांना तात्काळ यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील डॉ.सचिन मर्दा यांच्याकडे रेफर केले .

डॉ. सचिन यांनी प्राथमिक तपासणीअंती दुबिर्णीद्वारे रोबोटीक सर्जरी करत रुग्ण श्री संदानंद कल्याणकर यांना कॅन्‍्‍सरच्या पहील्याच टप्प्यात कॅन्सरमुक्‍्त करण्याची किमया साधली आहे .

 

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या विषयी 

ऑन्कोलॉजी आणि कर्करोग काळजी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय योगदान असून त्यांनी मागील १६ वर्षांहून अधिक काळात गंभीर कॅन्सर ग्रस्त असलेल्या १५००० पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत यात अद्यायावत असे रोबोटिक आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेतील अग्रगण्य तंत्रज्ञानासह केल्या आहेत दरम्यान त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो रुग्णांना जिवनदान दिले आहे तसेच डॉ. सचिन यांची दर महीन्याच्या पहील्या बुधवारी व्हिजिट असते तरी गरजू रुग्णांनी व कॅन्सर ग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा

 

 

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *