शहर

विरोधी पक्षनेते मसुदखान यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आलेल्या मसुदखान यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. या निर्णयामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या वादाला नवे वळण मिळाले असून महापौरांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने तात्पुरती रोक लावली आहे.

महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे मिळून १५ नगरसेवक असून एमआयएमचे १४ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर दोन्ही गटांनी दावा केला होता. काँग्रेस-वंचित आघाडीकडून माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या नावाची शिफारस महापौर कविता मुळे यांच्याकडे करण्यात आली होती, तर एमआयएमने मसुदखान यांच्या नावाची शिफारस केली होती.

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचे अधिकार महापौरांकडे असल्याने त्यांनी एमआयएमचे मसुदखान यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, या निर्णयाला काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफार आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले.

याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने मसुदखान यांच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *