शहर

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

 

नांदेड, दि. १५ जुन : महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो दिव्यांगांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला.

सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, अपुरे कर्मचारी वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे आदी मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी महापालिका उपायुक्तांनी 151 दिव्यांगांपैकी कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 137 दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित निधी आज सायंकाळपर्यंत अथवा उद्या सायंकाळपर्यंत जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र जागा, अतिरिक्त दोन कर्मचारी आणि दिव्यांगांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याविरुद्ध योग्य कारवाई करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली असून काही काळ महापालिका परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते.

या आंदोलनात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह अमरदिप गोधने, प्रमोद मांजरमकर, शिवाजी सूर्यवंशी, सय्यद आरिफ, कार्तिक कुमार भरतिपुरम, प्रदिप हनवते, शेख मतीन, शेख माजिद, अजय गोरे, रमेश लंकाढाई, राजू ईराबत्तीन, मोहसिन खान, मंगेश जाधव, शेख आलिम, आत्माराम लोंढे, रामेश्वर बंडेवार, नागोराव कदम, मोसिन कादरी, मामिडवार सावकार, प्रशांत हणमंते, शेख रसुल, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, जैनाज खानम, लोणे ताई यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते तर या आंदोलनस्थळी तृतीय पंथांच्या गुरू यांनी भेट देऊन प्रशासनाला दिव्यांगांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *