दिव्यांगाच्या मतदान कार्ड परतीच्या भुमिकेचा प्रशासनाने घेतला त्वरित निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

नांदेड प्रतिनिधी / सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिनी शेकडो दिव्यांगांनी आप आपले मतदान कार्ड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना परत करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली, देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष पूर्ण होत ७८ वे वर्ष सुरू झाले तरी दिव्यांगांना आपल्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सोयी सुविधांसह शासनाच्या विविध योजनांपासून अद्याप वंचित रहावे लागल्यामुळे

तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था/नागरी स्वराज्य संस्था, खासदार आमदार यांच्याकडील सुद्धा दरवर्षीचा निधी दिव्यांगांवर खर्च केला जात नसल्याने संतप्त शेकडो दिव्यांगांनी आम्ही आजवर मतदान करून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर आमच्या समस्या सभागृहात मांडत नसतील तसेच आमचा राखीव निधी सुद्धा खर्च करत नसतील तर मग आम्ही मतदान तरी
का व कोणाला करावे अशी कठोर भुमिका दिव्यांगांनी आज घेत सध्या राज्यासह देशात उपस्थित झालेल्या ७६ लाख नव मतदारांमुळे आम्हाला सुद्धा आता संशय निर्माण होत असल्यामुळे तसेच सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी सुद्धा आमच्या मताचा गैरवापर करून एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करणारेच सर्व एकत्रित येऊन या झाडावरून त्या झाडावर चढणा-या माकडांसारखे या पक्षातून त्या पक्षात जाऊन पक्षांतर करून सत्तेत सहभागी होत आमची फसवणूक केली असल्याचे म्हणत सर्वच राष्ट्रीयकृत पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी सुद्धा मागणी आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे दिव्यांगांनी केली आहे.
तसेच मतदान कार्ड परत करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी आमचे मतदान कार्ड परत घ्या म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातच प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दंडाधिकारी शाखेचे दिवाकर यांना दिव्यांगाचे निवेदन घेण्यासाठी पाठविले असता दिव्यांगांनी निवेदन व आपले मतदान कार्ड परत दिले असता दिवाकर यांनी मतदान कार्ड मला परत घेण्याचा अधिकार नाही मी तुमचे निवेदन स्विकारतो म्हणताच दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य द्वार समोरच तीन ते चार तास ठिय्या केला, तदनंतर परत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या भुमिकेची त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन तात्पुरता मोर्चा स्थगित केला आहे. यावेळी जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कामानिमित्त आले असता संतप्त दिव्यांगांनी त्यांचा घेराव करत अनेक प्रश्नांचा भडीमार केला तेंव्हा त्यांनी दिव्यांगांचा खासदार निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या लेखी पत्रामुळे सकाळपासूनच संतप्त असलेल्या दिव्यांगांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले, या आक्रमक भुमिकेचे नेत्रुत्व राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील यांनी आज केले तर या आंदोलनात प्रदिप हणवते,रवि कोकरे,शिवाजी सुर्यवंशी,शेख उमर, कार्तिक भरतीपुरम, धर्मेंद्र नालटे.शेषेराव वाघमारे, सय्यद आरिफ, मोहसिन खान, मुंजाजी कावळे,शेख आतिक, भोजराज शिंदे, रमेश शिंदे, कल्पना सप्ते,मुकबधीर कर्णबधिर दिव्यांग संघटनेसह शेकडो दिव्यांग बांधव आणि भगीनी उपस्थित होते
खासदार रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात आंदोलन कर्ते दिव्यांगांची भेट घेऊन खासदार निधी खर्च करणार असल्याचे दिले आश्वासन
दिव्यांगांच्या सार्थ मागणीला पत्रकारांचेही समर्थन स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची केली व्यवस्था



