परभणीच्या जायकवाडीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यास रावण नगरीतील नागरिकांचा विरोध
जिल्हाधिकारी आदेशानुसार उपविभागीय अधिकारी,व जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी
समोर रावण नगरातील नागरिका सोबत तहसील इमारतीत बैठक संपन्न
बैठकीत 12 फेब्रुवारीच्या रावण नगरवासीयांना अतिक्रमण काढण्याचे अधिकाऱ्याचे आदेश ..!

रहिवाशांच्या एकूण न घेतल्यामुळे परभणीतील रावण नगरवासीय आपल्या भूमिकेवर ठाम..!
परभणी मागील काही दिवसांपासून खानापूर फाटा जवळ येथून जाणाऱ्या कॅनॉल ला लागून मोकळी जागा आहे या जागेवर गोरगरीब व बेघर असलेल्या नागरिकांनी ही जागा पकडून तिथे राहण्यापूर्ता निवारा केला आहे. मात्र हे अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे सांगत जायकवाडी पाटबंधारे विभागाने रावण नगरी येथील नागरिकांना अतिक्रमण काढण्यास सांगितले असून एक पत्र दिले होते तसेच या संदर्भात आज 6 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक बोलावली होती.
या बैठकीत उपविभागीय अधिकारी दत्तू जायकवाडी पाठबंधारे विभागाचे अमोल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, तहसीलदार संदीप राजापुरे व मोंढा पोलीस निरीक्षक गवते याच्या उपस्थित होते बैठकीत काही तोडगा निघाला नसून उलट 12 फेब्रुवारी पर्यत जागा मोकळी करून देण्यास सांगितले मात्र रावण नगर येथील नागरिकांनी आम्ही बेघर असून आम्हाला राहण्यासाठी जागा नसल्यामुळे आम्हाला इथेच राहू द्यावे अशी मागणी करत अतिक्रमण काढण्यास विरोध केला.



