शिक्षण

आमदार भीमराव केराम यांची पाटोदा आयटीआय ला सदिच्छा भेट

 

किनवट दि.७ किनवट माहूर विधानसभेचे विद्यमान आमदार भीमराव केरम यांनी समशेरसिंग पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटोदा स सदिच्छा भेट दिली.या भेटीमध्ये त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे ची सविस्तर माहिती घेतली त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोणत्या समस्या किंवा अडचणी आहेत का याचा आढावा घेऊन त्या समस्या व अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.या सदिच्छाभेटी वेळी त्यांचे गट निदेशक विजय कांबळे यांनी स्वागत केले. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थे अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली.

प्रशिक्षण संस्थेच्या कामकाजाबद्दल आमदार भीमराव केराम यांनी समाधान व्यक्त केले. डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू याची हमी देखील दिली.यावेळी.सहाय्यक अधिव्याख्याता शहाणे एच. जी,शिल्प निदेशक वैशाली खोकले,लिपिक एस.एस.राऊत, उषा हूरदुके,परमेश्वर भुरके यांची उपस्थिती होती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *