हेल्थ

युनानी चिकित्सा पध्दती (संक्षीप्त परिचय)- डॉ.अमीनोद्दीन सिद्दीकी

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – आज 12 फेब्रुवारी नॅशनल युनानी डेच्या निमित्ताने पारंपारिक भारतीय चिकित्सा पध्दतीमध्ये युनानी चिकित्सा पध्दतीचा समावेश होत असून युनानी ही आपल्या देशात प्रचलित चिकित्सा पध्दती आहे.
सध्या शासनाने आरोग्य सेवेत आयुष ला अंतर्भुत केले आहे म्हणजेच अॅलोपॅथी सोबत आयुर्वेद,
युनानी व होमियोपॅथी ई.ला काही प्रमाणात आरोग्य सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे.

सर्व प्रथम ग्रिस मध्ये Hippocrates (Father of Medicine) यांनी युनानीची संकल्पना मांडली,
मानवी शरीर हे चार अर्कान (Elementes) चे संयुग आहे त्यामध्ये आग,हवा,पाणी व माती हे मानवी शारिरात चार अख्लात ज्यामध्ये (Humours) खून/रक्त, सफरा/पित्त,सौदा व बलगम कफ यांचे संतुलित प्रमाण
शरीरात असणे आवश्यक आहे. हे प्रमाण बिघडल्यास मनुष्य आजारी होतो अशी युनानी संकल्पना आहे.

युनानी मध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी अस्बाबे सित्ते जरूरीरीया म्हणजेच सहा घटक अत्यंत आवश्यक
आहेत.ज्यामध्ये शुध्द हवा,शुध्द पाणी, संतुलित आहार व पेय,संतुलित निद्रा, योग्य पचन व उत्सर्जन आणि
आवश्यक व्यायाम असे युनानी औषधी बहुतांश हरबल (वनस्पती) व मिनरल (खनिज) असतात कमी औषधी प्राणी (एनीमल)
भार माध्यमातून तयार केली जातात. या सर्व औषधी विविध व्याधीनंवर अत्यंत गुणकारी ठरतात.युनानी मध्ये जराहत (सर्जरी) सुध्दा आहे तसेच युनानी उपचार पध्दतीमध्ये इलाज बीत तदबीर (पंचकर्म) हे विविध रोगांनवर अत्यंत उपयुक्त आहेत.सांधे दुखी,अर्धांगवायु,किडनीचे विकार, यावर युनानी मध्ये यशस्वी उपचार उपलब्ध आहेत.

मराठवाडयात जिल्हा परिषद अंतर्गत काही थोडे युनानी दवाखाने सध्या कार्यरत आहेत.त्यातील नांदेड
जिल्ह्यातील अर्धापूर येथील युनानी दवाखान्यावर लेखक स्वतः कार्यरत राहीले असून त्यांनी अत्यंत प्रामाणिक पणे गुणवत्तापुर्वक सेवा दिली आहे. म्हणूनच सर्व समाजाच्या रूग्णांना या दवाखान्याचा लाभ मिळाला.
आज ११ फेब्रुवारी ला हकीम अजमल खाँ साहब यांच्या वाढदिवसा निमित्ताने देशभरात नॅशनल युनानी डे
साजरा केला जात आहे. तरी “आओ मिलकर काम करे युनानी को आम करे” या घोष वाक्याने जनतेची आरोग्य सेवा करून युनानी मेडिसिनच्या माध्यमातून सर्व संतु निरामयः चे उदिष्ट साध्य करू या, असे आव्हान युनानी चिकित्सा तज्ञ डॉ.अमीनोद्दीन सिद्दीकी (बी.यु.एम.एस.) गोल्ड मेडेलिस्ट, सेवा निवृत्त युनानी वैद्यकीय अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *