वक्तव्याचा निषेध करत कृषी मंत्र्याच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

नांदेड : हाली एक रुपया भिकारी पण घेत नाही आम्ही शेतक-यांचा एक रुपयात पिक विमा भरून घेतो असे शेतक-यांची टिंगल करणारे बक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच केले होते. कृषीमंत्र्यांनी शेतक-यांची माफी मागण्यांच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान नांदेड जिल्ह्याच्यावतीने कौग्रेस कमिटी कार्यालयामोर रविवारी त्या वक्तव्याचा निषेध करत कृषी मंत्र्याच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन खा. रविंद्र पा. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश सरचिटणीस केदार या. साळुंके, प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर, जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख, बालाजी चव्हाण, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माधव पा. पवळे, उपाध्यक्ष गिरीधर पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष गणेश डगे, ता. अध्यक्ष शिवाजी पाटील, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष सत्यपाल सावंत, सुरेश जाधव, इंजि. नसिम पठाण, संजय वाघमारे, दिपकसिंय हजुरिया, शुभम भोसीकर, गोविंद पाटील, उष लांडगे, शिवनंदा देशमुख, सुरेखा बेहा सह अनेकजण उपस्थित होते. छायाचित्र ज्ञानेश्वर सुनेगावकर



