शहर

देगलूर नाका परिसरातील ‘कूल लँड कलर’ दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

 

नांदेड, 15 एप्रिल – शहरातील देगलूर नाका परिसरात बरकत कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या ‘कूल लँड कुलर’च्या दुकानाला आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

दुकानाचे मालक मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले की, दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. काही क्षणांतच आगने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून फक्त आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून आगीच्या कारणांची चौकशी सुरू आहे.
दुकान मालकाने प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *