गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या लिखारी काऊंटर (देणगी काऊंटर) येथे देणगी साठी मानवरहित मशीन (E-GOLAK) बसविण्यात आली.

श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या पावन स्थान गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे देशा-विदेशातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनासाठी येतात व दिवसानदिवस त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या बाबीस लक्षात घेऊन गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या E-GOLAK या संकल्पनेतून गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या लिखारी काऊंटर (देणगी काऊंटर) येथे देणगी देण्यासाठी मानवरहित मशीन बसविण्यात आली.
ज्यामध्ये भाविकांना मशिनीवरचे QR कोड स्कॅन करून सोप्या पद्धतीने देणगी देता येईल. ज्याच्या मदतीने भाविकांना कमीत कमी वेळेत आपल्या अरदास, प्रसाद, लंगर सेवा इत्यादींसाठी देणगी देण्यास मदत होईल. या मशिनिद्वारे देणगी देणाऱ्या भाविकांना तत्काळ आपल्याद्वारे दिलेल्या देणगीची पावती प्राप्त होईल ज्यावर भाविकाचे नाव, अरदास व देणगीची रक्कम लिहलेली असेल.
या मशीनीची वैसाखीच्या शुभदिवशी ग्रंथी सिंघांच्या हस्ते अरदास करून गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांसाठी सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रशासक साहेबांसोबत स. जसवंत सिंघ जी (बॉबी) दिल्ली, स. रविंदर सिंघ जी बुंगई, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. गुरबचन सिंघ शिलेदार, वरिष्ठ सहा. अधिक्षक स. शरण सिंघ सोढी, सहा. अधिक्षक स. हरजीत सिंघ कडेवाले, स. रविंदर सिंघ कपूर, स. बलविंदर सिंघ फौजी, स. जैमल सिंघ ढिल्लो व यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक्षक, गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड.



