जिल्हा क्रीडा संकुलाची 25 एकर जमीन त्वरित हस्तांतरित करावी नांदेड ऑलिंपिक संघटनेची मागणी

नांदेड. दि 16 / महाराष्ट्र भरात सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा म्हणजे नांदेड, शहरात हक्काचे एकही मैदान उपलब्ध नाही त्यामुळे खेळाडू विविध खेळापासून वंचित आहेत करिता पंचवीस एकर जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई स्तरावर प्रलंबित आहे तो प्रस्ताव त्वरित मार्गी लावून ती 25 एकर जमीन त्वरित जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरित करावी अन्यथा 25 एप्रिल पासून नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन व एक विद क्रीडा संघटनाच्या माध्यमातून उपोषण करण्याचा इशारा संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड व कोषाध्यक्ष प्राध्यापक जयपाल रेड्डी बंटी सोनसळे गोविंद पांचाळ यांनी दिला आहे.
मराठवाड्यात संभाजीनगर नंतर सर्वच बाबतीत नांदेड चा नंबर लागतो त्यामुळे तात्कालीन माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तात्कालीन पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मौजे असर्जन (कौठा ) येथील गट क्रमांक 111 112 113 114 115 संदर्भातील जमीन फेर मोजणी करून 25 एकर जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविला होता सदर प्रस्ताव मा अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई येथे मागील तीन-चार वर्षापासून प्रलंबित आहे सदरचा प्रस्ताव तात्काळ निकाली काढून 25 एकर ची जिल्हा क्रीडा संकुलाची जागा जिल्हा क्रीडा संकुल समिती नांदेडला हस्तांतरित करावी अशी मागणी नांदेड ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने व जिल्ह्यातील सर्व एक विविध क्रीडा
संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब क्रीडामंत्री दत्ता भरणे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पालकमंत्री नांदेड अतुलजी सावे खासदार अजितजी गोपछडे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण नांदेड लोकसभा तसेच मंत्रालयीन स्तरावर संबधीत सर्व अधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे . सदर निवेदनावर ऑलम्पिक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी ,प्रलोभ कुलकर्णी ( ॲथलेटीक), राहुल वाघमारे (तलवारबाजी) जनार्दन गोपिले (रस्सीखेच), रमण बैनवाड (योगा) डॉ .दिनकर हंबर्डे (बुद्धिबळ)
रमेश नांदेडकर (खो खो) विनोद गोस्वामी (बास्केटबॉल) राजेश जांभळे (वुशू) वृषाली पाटील जोगदंड (धनुर्विद्या) जस्विंदर सिंगरामगडिया (वेट लिफ्टिंग) ज्ञानेश्वर सोनसळे (सायकलिंग) राष्ट्रपाल नरवाडे (कुराश) अजगर आली पटेल (कबड्डी) आट्यापाट्या) जयपाल रेड्डी (जिम्नास्टिक) (ट्रायथॉलॉन) विष्णु पूर्णे (कॅडबॉल) मधुकर शिरसागर (पावरलिफ्टिंग)इमरान खान (स्केटिंग) कुलदीप सिंग जाट (मलखांब) मनोज जोशी (हँडबॉल) बालाजी सिनेवाड (टेनिकोईट) बालाजी जोगदंड (तायक्वांदो) डॉ. दिलीप भडके नवनाथ पोटफोडे मधुकर कांबळे याच्या निवेदनावर सह्या आहेत .



