शहर

नांदेड शहरात वाहतूक नियम अंमलबजावणीसाठी ऑटो संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक,

 नागरिकांना सूचना व जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश

नांदेड (प्रतिनिधी) – शहरात वाढणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड शहर वाहतूक शाखेच्यावतीने आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता ऑटोरिक्षा संघटनेचे पदाधिकारी व ऑटो चालकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली.

शहर वाहतूक शाखेचे सपोनि राजकुमार हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक इतवारा कार्यालयात पार पडली. बैठकीत ऑटो चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑटो चालकांना विविध बॅनर व सूचनाफलकाच्या माध्यमातून खालील सूचना देण्यात आल्या:

ऑटो चालविताना पांढऱ्या गणवेशाचे पालन करणे अनिवार्य,  ऑटो फक्त अधिकृत स्टँडवरच थांबवावा,  समोरील सीटवर प्रवासी बसवू नये,  वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावी.

या बैठकीला अहमद बाबा बागवाले (प्रदेशाध्यक्ष – टायगर ऑटो संघटना), मोहम्मद तय्यब (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), शेख अहमद (जिल्हा प्रमुख नांदेड) आणि इतर पदाधिकारी व ऑटो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर चंदासिंग कॉर्नर, ढवळे कॉर्नर, जुना मोंढा व देगलूर नाका येथे कोपरा सभा घेऊन वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. शहरातील रस्त्यांवरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिम सुरू असून, लवकरच जुना मोंढा टॉवर, देगलूर नाका व बर्की चौक भागातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.

आठवडा बाजाराचे स्थलांतर, “फ्री लेफ्ट” योजनेंतर्गत चौकांतील काम, ट्राफिक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग चिन्ह, स्टॉप लाईन रेषा इ. बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेसोबत समन्वय करून लवकरच अंमलबजावणी होणार आहे. टोईंग वाहनाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

शहरातील सुजाण नागरिक व शासकीय अधिकारी यांचा समावेश असलेला एक वाहतूक समन्वयक गट स्थापन केला जाणार आहे, जो जनजागृती व पोलीस-जनता समन्वयाचे काम पाहणार आहे.

वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *