मराठवाडा

भावनांच्या सागरात एक अनमोल सन्मान…मा. कोठलीकर साहेबांना स्नेहपूर्ण निरोप.

 

न्याय म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचा जागर होय. मा. श्री. दिनेश कोठलीकर साहेब, जिल्हा न्यायाधीश – १, यांनी बिलोली न्यायालयात आपल्या कार्यकाळात याच मूल्यांना मूर्त स्वरूप दिले. त्यांची पनवेल येथे बदलीनंतर बिलोली न्याय, पोलीस, विधिज्ञ, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या मनात एक अनाम दुःख आणि भावनिक पूर उसळला.

गादगे फार्म हाऊस, बिलोली येथे आयोजित निरोप समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तो एका श्रेष्ठ न्यायदेवतेच्या माणुसकीला दिलेला सन्मान होता. उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, अंगरक्षक आणि कर्मचारी यांचे डोळे पाणावले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. न्यायाधीश श्री. शेख साहेब होते, तर प्रमुख पाहुणे मा. न्यायाधीश श्री. घोरपडे साहेब होते.
श्री. यशवंत गादगे (माजी उपनगराध्यक्ष, बिलोली) यांनी भावपूर्ण शब्दांत कोठलीकर साहेबांच्या कार्याचा गौरव करताना मंचावरच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

पोलीस प्रशासनाचे मा. मुंडे साहेब (PI, देगलूर), अतुलजी भोसले (PI, बिलोली), एपीआय शिंदे साहेब (कुंडलवाडी), जगताप साहेब (शंकर नगर), पाटील साहेब (कुंटूर), श्री फड PSI देगलूर व सूर्यवंशी (PSI देगलूर) साहेबांनी मा. कोठलीकर साहेबांच्या पारदर्शक, कर्तव्यनिष्ठ कार्यशैलीचे जिव्हाळ्याने कौतुक केले. या क्षणी त्यांच्या आवाजात गहिवर स्पष्ट जाणवत होता.
बार कौन्सिल चे अध्यक्ष विधीतज्ञ एस एन पाटील
विधिज्ञ येरावार साहेब, रमाकांत साहेब,माजी नगरसेविका कविता अरुण गादगे, अंगरक्षक गंगाधर गादगे, सौ. श्रुती गादगे व
सर्व पोलीस कर्मचारी
गंगाधर गादगे एस एस लिबाडे साईनाथ घोणरणे माधव दंतापल्ले संजय चरकुलवार माधव पाटील संजय गवलवाड साईनाथ एमेकर
ए. ए. शेख
सर्व न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह उपस्थित नागरिकांची मनंही अश्रूंनी भरून वाहत होती.

न्यायदेवता मा. कोठलीकर साहेब जेव्हा शेवटचे भाषण करायला उभे राहिले, तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.
इतक्या थोर न्यायदेवतेच्या डोळ्यात अश्रू यावेत का, या विचाराने निसर्गही व्यथित झाला असावा.
आणि म्हणूनच… त्या क्षणी वेळेवर पावसानेही हलकेच हजेरी लावली — जणू अश्रूंना साथ देण्यासाठी आणि त्या क्षणाला आणखी पवित्र करण्यासाठी.येऊन वाट मोकळी केली

पत्रकार रत्नाकर जाधव, यादव लोकडे, मार्तंड जेठे, शेख फारूख भाई, शेख मौलाना साब, अर्जुन पवार सादिक पटेल शेख हैदर बालाजी शंखपाळे चंद्रकांत शंखपाळे रोहिदास ढोकळे आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तूशेठ रायकंटवार, राजू सेट गंगावार हेही अशा हळव्या क्षणी अश्रूंना अडवू शकले नाहीत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपाळराव चौधरी सर यांनी अतिशय सुरेख, भावपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने केले.

कार्यक्रमानंतर सर्वांसाठी शाही शुद्ध शाकाहारी भोजनाची सुंदर मेजवानी देण्यात आली.

मा. कोठलीकर साहेब, आपण बिलोलीसाठी केवळ न्यायाधीश नव्हता, तर न्यायाचा सजग, संवेदनशील आणि माणुसकीचा चेहरा होतात.
आपल्या स्मृती, आपली मूल्यं आणि आपली कार्यशैली बिलोलीकरांच्या अंतःकरणात कायमची कोरली गेली आहेत.

आपल्याला पुढील सेवाकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
न्यायव्यवस्थेतील आपला प्रवास सदैव तेजस्वी, सन्माननीय व प्रेरणादायी ठरो.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *