धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांना “ दि लिजेन्ट ” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले

नांदेडच्या समाजसेवेत अलौकिक कामगिरी करणारे धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांना मानव सेवा क्षेत्रात सात्यतपूर्ण कामगिरी केल्या लायन्स इंटरनॅशनल मल्टीपल कॉन्सिल तर्फे नाशिक येथे “ दि लिजेन्ट ” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांना देशविदेशातून मिळालेल्या पुरस्कारांची संख्या १०१ झाली आहे.
हॉटेल ट्रीट मध्ये झालेल्या समारंभात लायन्स पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर जितेंद्रसिंह चौहान आग्रा , मल्टीपल काउन्सिल चेयरपर्सन सुनील देसरडा यांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन दिलीप ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंटरनॅशनल थर्ड वाईस प्रेसिडेंट मनोज शहा केनिया, लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया, उप प्रांतपाल बाजोरीया, राहुल औसेकर, योगेश जायस्वाल, पूर्व प्रांतपाल दिलीप मोदी, जयेश ठक्कर, प्रवीण अग्रवाल, नारायणलाल कलंत्री हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राऊत यांनी तर सरदार बलबीरसिंह यांनी आभार मानले.
२२ वर्षांत १५ लाखांहून अधिक अन्नाचे डबे गरजूंना पोहोचवणारे आणि निराधारांच्या सेवेत स्वतःला वाहून घेणाऱ्या दिलीप ठाकूर यांची समाजसेवा आज एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावर राहणाऱ्या असहाय्य, निराधार, मानसिक संतुलन हरवलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची दाढी-कटिंग, अंघोळ, स्वच्छ कपड्यांची देवाणघेवाण आणि १०० रुपयांचे रोख बक्षीस देण्याची सेवा ते गेल्या ५९ महिन्यांपासून सातत्याने करत आहेत.
याशिवाय, गेल्या ७ वर्षांपासून थंडीच्या काळात त्यांनी सुमारे चौदा हजारापेक्षा अधिक ब्लँकेट रस्त्यावर झोपणाऱ्या बेघरांना वाटले. पावसाळ्यात ‘कृपाछत्र’ उपक्रमांतर्गत १०,००० पेक्षा जास्त छत्र्या वितरित करण्यात आल्या. तर ‘चरण सेवा’ या उपक्रमातून अनवानी फिरणाऱ्या बेघरांना आता पर्यंत १०,००० पेक्षा जास्त चपला वाटण्यात आल्या आहेत.भुकेलेपणावर तोडगा म्हणून त्यांनी नांदेडमध्ये ‘भाऊचा इंसानियत फ्रिज’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. या फ्रीजमध्ये दररोज ४० ते १२० अन्नाचे डबे ठेवले जातात, जे गरजू व्यक्ती घेऊन जातात. कोरोना काळात त्यांनी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज घरोघरी जाऊन जेवणाचे डबे वाटप केले होते.
धार्मिक क्षेत्रातही दिलीपभाऊंच योगदान लक्षणीय आहे. सत्यगणपती, औंढा नागनाथ, श्री क्षेत्र माहूर, रत्नेश्वरी यांसारख्या धार्मिक स्थळांची पदयात्रा त्यांनी आयोजित केली. २५ वर्षांपासून अमरनाथ यात्रेचे आयोजन करत असून त्यांनी शेकडो ज्येष्ठ नागरिकांना कठीण यात्रा घडवली आहे.प्रत्येक वर्षी गोदावरी काठी हजारो महिलांचा सहभाग असलेल्या गोदावरी गंगा पूजन कार्यक्रमाचे आयोजनही ते करतात.३६ वर्षांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या गणेश मंडळासाठी गणपतीची मूर्ती देण्याची परंपरा ते अविरत सुरू ठेवत आहेत. आज त्यांच्या संग्रही ५०० पेक्षा 🫡अधिक अनोख्या गणेश मूर्ती आहेत.
दिलीप ठाकूर यांनी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, विविध स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, औषध वाटप यांसह ९० हून अधिक सामाजिक उपक्रम दरवर्षी यशस्वीपणे पार पाडत आहेत. विविध पातळ्यांवर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सेवा करणारे दिलीपभाऊ हे महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहेत.
या समर्पित कार्याची दखल घेत देश-विदेशातून १०१ सन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.दि लिजेंट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रवि कडगे, विजय होकर्णे, गंगाबिषण कांकर, डॉ. विजय भारतीया,हर्षद शहा, सतीश सामते, प्रा.रवि शामराज, किशोर भारतीया,मोहन देशमुख, ऋषिकेश नेरळकर, श्रीपाद योगी, प्रवीण देशमुख, शिरीष गिते, अशोक कासलीवाल, मनिष माखण, केदार मालपाणी, सुभाष कासलीवाल, रमेश मिरजकर, किशोर पाटणी, गिरीश ठक्कर,ममता व्यास, निलम कासलीवाल यांच्यासह अनेकांनी दिलीप ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.



