धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना “लोकशाही मराठवाडा रत्न पुरस्कार”

अनेक सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला देशविदेशातून एकशे एक पुरस्कार मिळणे ही असामान्य बाब असल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे प्रतिपादन “एन्जॉय स्विमिंग ग्रुप” च्या वतीने आयोजित”लोकशाही मराठवाडा रत्न पुरस्कार” मिळाल्या बाबत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. पि. टी .जमदाडे यांनी केले.
जे.एम.एस.गार्डन मध्ये आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानी एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.पी.सुदर्शन, सराफा असोशिएशनचे अध्यक्ष दीपक बोधने, माजी नगरसेवक व्यंकटेश जिंदम व गंगाधर बडवणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठित व्यापारी जयप्रकाश मुंदडा यांनी दिलीप ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे सांगितले. त्यानंतर दिलीप ठाकूर व माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक बोधने,
व्यंकटेश जिंदम,जयप्रकाश मुंदडा, शिरीष गिते यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करतांना ॲड.दागडिया यांनी सांगितले की, गेल्या पस्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या एन्जॉय स्विमिंग ग्रुप मध्ये सचिव म्हणून दिलीप ठाकूर यांनी केलेल्या कार्याला तोड नाही.त्यांचे वर्षभरात चालणारे नव्वद पेक्षा जास्त उपक्रम हे दुसरा कोणीही करूच शकत नाही.यामुळेच त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.
सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, एन्जॉय स्विमिंग ग्रुप च्या सदस्यांच्या पाठिंब्यामुळेच मला हे सर्व शक्य होऊ शकले.घरच्यांनी केलेल्या सत्कारामुळे आणखी कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश मुंदडा यांनी तर आभार मुरलीधर अट्टल यांनी मानले. कार्यक्रमाला सुभाष गादेवार,बालाजी यलगंटवार, शैलेश तोष्णीवाल,नारायण चव्हाण, डॉ. सुनील बासटवार , चंद्रप्रकाश लालवाणी, राजेशसिंह ठाकूर, शिरीष गिते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.याप्रसंगी सौ. शीला सुदर्शन, सौ. नीता दागडिया, सौ. शशिकला मुंदडा,सौ.गौरी बासटवार,सौ.रेणुका तोष्णीवाल, सौ. अरुणा यलगंटवार,सौ. अनिता गिते, सौ. पुष्पा लालवानी सौ. नेहा राजपूत यांच्यासह सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.अर्णवसिंह राजपूत या अकरा वर्ष्याच्या बालकाने गायलेल्या सुंदर पोवाड्याने
कार्यक्रमाची सांगता झाली.



