हेल्थ

कर्करोग तपासणीसाठी फिरते वाहन जिल्ह्यात दाखल; 23 जूनपर्यंत गावोगावी मोफत शिबिरे

नागरिकांनी लाभ घ्यावा - सीईओ मेघना कावली यांचे आवाहन

 

नांदेड,23-  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज फिरती कर्करोग तपासणी व निदान मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. या मोबाईल व्हॅनव्‍दारे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दिनांक 23 जून पर्यंत ही सेवा नागरिकांना उपलब्ध राहणार आहे.

     या शिबिरांमध्ये प्रामुख्याने मौखिक कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोग यांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ दंत शल्यचिकित्सक व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा राबवली जात असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयित रुग्णांची माहिती जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाकडे सादर करण्यात येईल.

     जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील 23 गावांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.

 

या गावांमध्ये होणार मोफत कर्करोग तपासणी शिबिरे

फिरत्या वाहनाव्‍दारे जिल्ह्यातील 23 ठिकाणी कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. दिनांक 22 मे हिमायतनगर तालुक्‍यातील सोनारी येथे तर 23 मे रोजी नांदेड तालुक्‍यातील बळीरामपूर येथे शिबीर संपन्‍न झाले. तर दिनांक 26 मे – पार्डी (अर्धापूर), 27 मे – भोसी (भोकर), 28 मे – तामसा (हदगाव), 29 मे – निवघा (हदगाव), 30 मे – लामकाणी (माहूर), 2 जून – वाई बाजार (माहूर), 3 जून – शिवणी (किनवट), 4 जून – इस्लापूर (किनवट), 5 जून – मुगट (मुदखेड), 6 जून – कलंबर बु. (लोहा), 9 जून – सुनेगाव (लोहा), 10 जून – धानोरा (कंधार), 11 जून – गऊळ (कंधार) 12 जून – बा-हाळी (मुखेड), 13 जून – पाळा (मुखेड), 16 जून – नर्सी (नायगाव खै.), 17 जून – कासराळी (बिलोली),18 जून – कुंडलवाडी (बिलोली), 19 जून – करडखेड (देगलूर), 20 जून – करखेली (धर्माबाद) तर 23 जून – सिंधी (उमरी) येथे शिबीर होणार आहे. तरी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र क्षेत्रातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *