डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांचे विविध आरोग्य संस्था यांना भेटी

नांदेड :- सध्या पावसाळाची सुरुवात होत आहे. किटक जन्य व जल जन्य आजार यांच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आज दि. 4 जून 2025 रोजी डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी त्यांच्या पथकासोबत किनवट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे भेट देऊन किटकजन्य आजाराचा आढावा घेतला व डेंग्यू दुषित रूग्णास भेट देऊन परिसर स्वच्छते बाबतीत आरोग्य शिक्षण दिले.

त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जलधारा येथे भेट देऊन कंटेनर सर्वे व हत्तीरोग रात्र चिकित्सालय जलधारा येथे हत्तीरोग कार्यक्रमाची तपासणी व पाहणी केली. याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम ता. हिमायतनगर येथे भेट देऊन नियमितपणे रक्त नमुने व संशयीत डेंग्यू रुग्ण यांचे रक्त जल नमुने घेण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण रूग्णालय भोकर येथील प्रयोगशाळेत भेट देऊन हिवताप व क्षयरोग कार्यक्रमाची कामाची पाहणी केली.
हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर येथे भेट देऊन नियमितपणे अळीनाशक औषधी फवारणी व हत्तीपाय रूग्णास अपंग प्रमाणपत्र देण्याच्या सुचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, हत्तीरोग कर्मचारी यांना सूचना देण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले व आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, वाहन चालक मुकुंद देवकांबळे उपस्थित होते.



