प्रभाग क्र. १७ मध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा – नागरिक व विद्यार्थी त्रस्त, काँग्रेसकडून महावितरणकडे निवेदन

नांदेड : प्रभाग क्र. १७ अंतर्गत येणाऱ्या गोवर्धन घाट, टेकडी आणि दिलीपसिंह कॉलनी परिसरात सतत कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. लाईट वारंवार बंद पडल्याने रात्रीच्या वेळेस चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे, अशी तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या समस्येबाबत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे दीपकसिंह हजुरिया व गगर यादव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक सुरेंद्र घोडजकर, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, काँग्रेस सचिव संजय शर्मा, बालाजी ठाकूर, रत्नाकर जोंधळे, गौतम शिरसाठ, रितेश तिवाडी, गोविंद पाटील, नागराज सुजलेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात मुख्य मागण्या: विद्युत पुरवठा सुरळीत करावा
आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर किंवा नविन लाईन बसवावी
रात्रीच्या वेळेस सुरक्षा वाढवावी
निवेदन स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यांनी लवकरच संबंधित तांत्रिक पथक पाठवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. छायाचित्र: ज्ञानेश्वर सुनेगावकर



