भुसावळ विभागात लाईन ब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत काही गाड्यांचे मार्ग बदल, काही गाड्या अंशतः रद्द

नांदेड (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड स्थानकावर **यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक** घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल, काही गाड्या अंशतः रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी कळविले आहे.
मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी क्र. 11410 निझामाबाद – पुणे, दिनांक 06.09.2025
2. गाडी क्र. 16733 रामेश्वरम – ओखा, दिनांक 05.09.2025
3. गाडी क्र. 12715 हु. सा. नांदेड – अमृतसर, दिनांक 07.09.2025
4. गाडी क्र. 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हु. सा. नांदेड, दिनांक 07.09.2025
5. गाडी क्र.17618 हु. सा. नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दिनांक 07.09.2025
अंशतः रद्द (Short Terminations) गाड्या :
1. गाडी क्र. 12072 हिंगोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दिनांक 07.09.2025
→ हिंगोली ते नगरसोल पर्यंत धावेल. नगरसोल ते मुंबई दरम्यान रद्द.
2. गाडी क्र. 17688 धर्माबाद – मनमाड, दिनांक 07.09.2025
→ धर्माबाद ते औरंगाबाद पर्यंत धावेल. औरंगाबाद ते मनमाड दरम्यान रद्द.
3. गाडी क्र. 17064 काचीगुडा – मनमाड, दिनांक 06.09.2025
→ काचीगुडा ते नगरसोल पर्यंत धावेल. नगरसोल ते मनमाड दरम्यान रद्द.
बदललेले मार्ग :
पूर्णा – परभणी – परळी – लातूर रोड – कुरुडवाडी – दौंड मार्गे वळविण्यात येईल
पूर्णा – हिंगोली – अकोला – भुसावळ – जळगाव – पलधि मार्गे वळविण्यात येईल
पूर्णा – हिंगोली – अकोला – भुसावळ – खांडवा मार्गे वळविण्यात येईल
कल्याण – कर्जत – लोणावळा – पुणे – दौंड – कुरुडवाडी – लातूर – लातूर रोड – परळी – परभणी – पूर्णा मार्गे वळविण्यात येईल
पूर्णा – परभणी – परळी – लातूर रोड – लातूर – कुरुडवाडी – दौंड – पुणे – लोणावळा – कल्याण मार्गे वळविण्यात येईल
सूचना : प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांचा विचार करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
–



